२५ मे, २०११

आमराई

DeeceÛeer Deieoer cees"er DeecejeF& Deens. Deecner MeehÙee DeebyÙeeJej

GvneUŸeeÛÙee meg=šdšerle megjheejbyÙee KesUeÙeÛees. Oeceeue cepee ÙeeÙeÛee.

Ùee HeâeboerJe®ve lÙee HeâeboerJej oCeeoCe G[Ÿee ceejeÙeÛees.

yeeUt, hekeäÙee, megKee, jeceoeme, pentj, Meskeâueeue meieUsÛe

peceeÙeÛes. keâgCeer MesUŸee, keâgCeer cnMeer lej keâgCeer yewue

ÛeejeÙeuee DeeCeeÙeÛes. GvneUŸeeÛeer meieUer efhekeâs keâe{uÙeeJej

ceeies DemeCeeje heeuee-heeÛeesUe KeeCÙeemee"er meieUŸee

peveeJejebÛee cegkeäle mebÛeej DemeeÙeÛee. ceie keâeÙe

Deecner meieUs KesUeÙeuee ceeskeâUs. Kethe KesUeÙeÛees...

ueheb[eJe KesUeÙeÛees lej keâOeer megjkeâe"Ÿee, keâOeer

efkeÇâkeâsš KesUeÙeÛees lej keâOeer keâgjIees[er... ve vee ve vee Iees[er efkeâlòes keât?

Deefmmekeât... keäÙee Keeleer? Deeše yeeše ...

Demeb keâjle ve vee ve vee KesUeÙeÛeb. ÛebHeâgue KesUeÙeuee osKeerue Kethe cepee ÙeeÙeÛeer.

ieesšŸee, helebie, YeJeje ns KesU lemes JesU heentve KesUeÙeÛees. Helebie meeOeejCeleŠ

mebkÇeâebleerÛÙee JesUer heCe yeekeâer KesU Je

yewueiee[erÛÙee DeemeeYeesJeleer DemeCeeNÙee legbyÙeeuee ueesKeb[er hešdšer ieesues hešdšer

yemeJeuesueer DemeeÙeÛeer. leer hešdšer DeLee&le jerbie, keâg"s ÛekÇeâer lej keâg"s efMekeâyeebie[

cnCetve heÇefmeOo DemeCeejer ieesue yeebie[ermeejKeer heCe cees"er ueesKeb[er jerbie Je leejeÛee

Deekeâ[e keâ®ve jmlÙeeves , Mesleelegve, ieuueerlegve ngkeâ De[keâJetve heUJetve vÙeeÙeÛeer...

ngkeâmee"er JeehejuÙee peeCeeNÙee peer DeeÙe leejsÛeeÛe ieesue ieesue oesve ÛeekeâbeÛee

iee[e yeveJeeÙeÛee. ceeies ueebye leej Je neleele mšsDeefjbiemeejKee ieesue. DeMee

KesUCÙee yeveJeleebvee Je KesUleebvee KejbÛe cepee ÙeeÙeÛeer.

efyeveKeÛee&Ûeer Je Meeefjjerkeâ neueÛeeue keâjeÙeuee ueeJeCeejer KesUCeer Ùeele yeeueheCe jbietve peeÙeÛeb. Deecner GvneUŸeele heesneÙeuee peeÙeÛees. Veoeruee heeCeer vemeeÙeÛeb hejbleg efJenerjerle

Je®veÛe oCeeoCe G[Ÿee ceejeÙeÛees... Yejhetj cevemeeskeäle heesneÙeÛeb.. DeeefCe ceie meieUsÛe

keâgCeeÛÙee lejer DeecejeF&le efMejeÙeÛes. keâgCeeÛÙee lejer Heâe[er MeesOeeÙeÛÙee, cevemeeskeäle Deebyes KeeÙeÛes ...MesleeleÛe Ke[d[e keâjeÙeÛee Meekeâ ueeieuesuee keâg"s hee[eÛee Deebyee cnCeleele

ueg[yeg[ DemeeÙeÛeer. heÇmebieer cees"er ceeCemes Deesj[eÙeÛeer osKeerue

DeeceÛÙee hewkeâerÛe keâgCeerlejer Dee{er heUJeuesueer DemeeÙeÛeer.

Gvneleevnele YeškeâeÙeÛeb – OeeJeeÙeÛeb KesUeÙeÛeb. Gve ueeieg veÙes cnCetve efKeMeele

Úesšemee keâeboe "sJeeÙeÛee. keâOeer Gve ueeieuebÛe lej MesUerÛÙee ogOeeÛee mehekeâeje ceejeÙeÛee KesUleebvee keâener ueeieueb, KejÛešueb lej šCešCeerÛee heeuee yeebOeeÙeÛee. Keâeše Iegmeuee

DeLeJee cees[uee keâer lÙeeuee ®F&Ûee Ûeerkeâ ueeJeeÙeÛeer. ueiesÛe oesve efoJemeeble keâeše Jej

ÙeeÙeÛee.

heesneÙeuee iesueb keâer JesieJesieUs heÇÙeesie JneÙeÛes. ceesšsÛÙee ÛeekeâeJej yemetve G[Ÿee ceejeÙeÛees. keâOeer keâOeer lÙeeJe®ve meškeâeÙeÛees... heej efJenerjerÛÙee keâheejerpeJeUtve Keeueer heeCÙeele he[eÙeÛees. heeCÙeeÛÙee ceejecegUs Debie ueeue JneÙeÛeb... keâOeer keâOeer keâ[Ÿee

keâheejerbMeer Debie KejÛešeÙeÛeb ... heCe lÙeebÛÙee Iejer keâOeer keâgCeer keâewlegkeâ keâsueb veener.

DeeefCe Deecneueener keâener ueeieueÙe ÙeeÛeb Yeeve jenle veJnleb. "

heeJemeeUe Deeuee keâer yeKeejerÛeer meeHeâmeHeâeF& Je [eie[gpeerÛeb keâece meg® JneÙeÛeb

yeKeejermeceesj hebÛeJeerme efmecesbšÛeer he$es šekeâuesueer. yeepeguee peveeJejebÛee iees"e, peJeUÛe iegueceesnjeÛeer DeeefCe megyeeYeUerÛeer Ieveoeš Pee[er. yeKeejerMespeejer Ûengyeepegbveer Deieoer efYbeleerueieleÛe megyeeYeUerÛeer Pee[s. lÙeecegUs he$ÙeebJej Pee[eÛeer heeves ieUeÙeÛeer. ceie leer heeveb, heeuee-heeÛeesUe meieUÛeb Pee[tve meeHeâ keâsueb veener Jej heeJemeele efYepetve les efleLebÛe keâgpeeÙeÛeb DeeefCe ceie he$es ieUeÙeÛeer lÙeemee"er ce=ieeÛÙee heeJemeeÛÙee DeeOeerÛe meieUb meeHeâ metHeâ keâ®ve IÙeeÙeÛeb. DeeceÛeer keâeceele ceole leMeer keâceerÛe JneÙeÛeer. Hejbleg ceOesceOes

hejbleg Deecner Meekeâer ueeieuesuee Deebyee lees[eÙeÛee Je Ke[d[Ÿeele ieJele šekeâtve lÙeele Heâe[ "sJeeÙeÛeer. lÙeeJej KegCesÛee oie[ efkeâbJee keâenerlejer KetCe keâ®ve Ûeej – mene efoJemeebveer ÙeeÙeÛeb . keâOeer keâOeer DeeceÛeer Heâe[ lÙeeuee Dee{er cnCeeÙeÛees leer Dee{er heUJeuesueer DemeeÙeÛeer DeeefCe efleLebÛe DeebyÙeeÛeer meeue DeeefCe keâesÙeerbÛee {erie he[uesuee efomeeÙeÛee.

आपण चांगलं वागायचं ते लोकं चांगले आहेत म्हणून नव्हे तर आपण चांगले आहोत म्हणून!

तुमच्या कुटूंबियांसाठी सतत काहीतरी वेगळं करत रहा. त्यासाठी खूप खर्च करण्याची आजीबात गरज नाही. त्यामागचा विचार महत्वाचा आहे. तुम्ही त्यांच्याबद्दल प्राधान्यानं विचार केलात, एवढीच गोष्ट महत्वाची आहे.
तुमच्या कुटूंबाबरोबर एकजीव व्हा. त्यांच्याकडे व्यवस्थीत लक्ष पुरवा. आजच्या धावपळीच्या युगात आपल्याला हे शक्य वाटत नाही. हीच तुमची कसोटी आहे. त्याबद्दल व्यवस्थीत नियोजन करा.
परंतु कुटूंब म्हणजे फ़क्त बायको असं समजू नका.
ईतर लोक जे तुमच्यासाठी जे काही करताहेत ते त्यांच कर्तव्य आहे असं मुळीच समजू नका. ते असं चांगलं वागले नाहीत तरी त्यांचं काही बिघडणार नाही. ते तुमची काळजी करतात, किंवा त्यांना तुमच्याबद्दल काहीतरी वाटतं म्हणून ते छान वागतात. म्हणून त्यांनी जे काही केलं त्याची दखल घ्या. आपण काय केलं ते लक्षात नका ठेऊ. सबंध टिकवायचे असतील तर नेहमी सकारात्मक विचार करा.
आत्मकेंद्री वागण्याने आपण आपल्या लोकांपासून दूर जात आहोत ह्याचं भान ठेवा. आपण चांगलं वागायचं ते लोकं चांगले आहेत म्हणून नव्हे तर आपण चांगले आहोत म्हणून!

दुस-याला नंबर एक मानणं मोठं कठीण!


दुस-याला नंबर एक मानणं मोठं कठीण!
मी असं एकलंय की गांधी गोलमेज परीषदेसाठी लंडनला गेले होते. अन त्यावेळी त्यांचा एक भक्त बरनॉर्ड शॉला भेटायला गेला, आणि त्यानं शॉंना विचारलं,"तुम्ही गांधीजींना महात्मा मानता की नाही?"
भक्तांना खूप काळजी असते की त्यांच्या महात्म्याला दुसरं कुणी महात्मा मानतं की नाही! कारण त्यांना स्वतःलाच त्याबद्दल खात्री नसते, तेंव्हा ते दुस-याकडून खात्री मिळवू पाहतात. त्याला हे विचारायची काही आवश्यकता नव्हती. परंतु त्यालाच स्वतःलाच त्याबद्दल शंका असावी. म्हणून त्याने बरनॉर्ड शॉ ला विचारले.
त्याला वाटलं शॉ किमान तोंडदेखलं तरी हो म्हणतील, नाही म्हणू शकणार नाही. शॉसारखे लोक शिष्टाचार नाही तर सदाचार पाळतात. शिष्टाचार म्हणजे ब-याच वेळा नाटक असतं.
शॉ म्हणाला," तुमचे गांधी महात्मा आहेत पण ते नंबर दोनचे!"
"नंबर दोनचे? मग नंबर एकचे कोण आहेत?
शॉ म्हणाला, " मी!"
शॉ पुढे म्हणाला हे बघा मी खोटं बोलू शकणार नाही. कारण मी कुणालाही स्वतःच्या आधी ठेऊ शकत नाही. मानूच शकणार नाही. ही वस्तुस्थिती आहे.
त्या भक्ताला वाटलं काय अहंकारी माणूस आहे हा!
पण शॉ खूप प्रामाणिक माणूस होता.
कुणीही स्वतःलाच नंबर एक मानत असतो, अगदी कुणीही!

अरबीत एक म्हण आहे की, परमात्मा जेंव्हा माणसाला बनवतो तेंव्हा त्याला जगात पाठवण्यापुर्वी तो त्याच्या कानात एक गंमत सांगतो,"तुझ्यापेक्षा चांगला माणूस मी कधी बनवलाच नाही."


२० मे, २०११

मेंदू कशासाठी वापरायचा?

एकदा महान वैज्ञानिक आल्बर्ट आईनस्टाईन यांना कुणीतरी विचारलं, की एक मैल म्हणजे किती फ़ूट? त्यावर ते ऊत्तरले मला ठाऊक नाही. ज्या गोष्टी कुठल्याही संदर्भग्रंथामध्ये दोन मिनीटात सापडतील त्यासाठी मी माझं डोकं कशाला वापरू.

यातून आईन्स्टाईन यांनी आपल्याला चांगली शिकवण दिली, की आपण आपला मेंदू कशासाठी वापरायचा? तर तो विचार करण्यासाठी ना की सर्वसामान्य माहिती साठवायचं गोदाम म्हणून!

व्यक्तीमत्व....

एकदा एका फ़ार्मास्युटीकल कंपणीने मला एक काम दिलं होतं. त्या कंपणीचे आघाडीचे २५ % एम आर ७५ % पेक्षा जास्त व्यवसाय करत होते आणि अगदी शेवटचे ३० % एम आर एकूण विक्रीचे जेमतेम १० ते १२ % व्यवसाय करत होते. त्यांनी मला याबाबत अभ्यास करायला सांगीतले.
मी त्यांच्या कित्येक एम आर च्या फ़ाईल चाळल्या. त्या अभ्यासात एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समोर आली की त्या दोन्ही प्रकारच्या लोकांमध्ये बौद्धीकदृष्ट्या काही फ़रक नव्हता, किंबहुणा त्यांची शैक्षणीक पात्रता देखील सारखीच होती. त्यांच्या फ़क्त मानसिकतेत फ़रक होता. ज्यांचा सेकंडरी सेल्स चांगला होता ती मंडळी चिंता कमी करत होती, ते अधीक ऊत्साही होते. लोकांशी भेटण्या-बोलण्यात त्यांना मनापासून आनंद होत होता.

जन्मजात क्षमता आपल्या हातात नसते, त्या बाबतीत आपण काही करू शकत नाही. पण आपल्याजवळ जे आहे त्याचा वापर कसा करायचा हे आपण ठरवू शकतो.
लोकांना आपली क्षमताच कळत नाही.


एकदा माझ्या विद्ध्यार्थ्यांना मी एका मिनीटात मनी अर्थात पैसा चे पहिलं इंग्लीश अक्षर लिहायला सांगीतलं. त्या आधी त्यांनी सांगायचं होतं की ते किती वेळा लिहू शकता. जवळपास सर्व विद्ध्यार्थ्यांनी सांगीतल्यापेक्षा जास्त वेळा लिहीले.

याचा अर्थ त्यांची ते काम करण्याची पात्रता जास्त होती परंतु त्यांना माहीत नव्हती. असंच होतं. आपण आपली खरी किंमत जाणत नाही. आधी ती जाणा. नियोजन करा. काय मिळवायचं त्याचं सतत भान ठेवा.
कुठलीही गोष्ट फ़ुकट मिळत नाही. योग्य किंमत द्यावी लागते. त्यासाठी चांगली एक्सपर्ट लोकं सोबत असायला हवी. आणि अशी मंडळी सोबत हवी असेल तर त्यासाठी खर्च करायची माणसीकता हवी.
प्रत्येक क्षेत्रासाठी (एस डब्ल्यू ओ टी) सोट अनाल्यिसीस करणे गरजेचे ठरते.

१७ मे, २०११

माझ्या घरात आंब्याचे झाड आहे!

Posted by Picasa
Posted by Picasa

paus

Posted by Picasaपावसाच्या धारा येती झरझरा

झांकळलें नभ, वाहे

सोंसाट्याचा वारा

रस्त्याने ओहोळ जाती खळखळ

जागजागीं खाचांमध्ये तुडुंबले

जळ

ढगावर वीज झळके सतेज

नर्तकीच आली गमे लेवुनिया

साज

झोंबे अंगा वारे काया थरथरे

घरट्यांत घुसूनिया बसली

पाखरें

हर्षलासे फार नाचे वनीं मोर

पानांतून हळूं पाहे डोकावून

खार

पावसाच्या धारा डोईवरी मारा

झाडांचिया तळी गुरे शोधिती

निवारा

नदीलाही पूर लोटला अपार

फोफावत धांवे जणू नागीणच

थोर

झाडांची पालवी चित्ताला मोहवी

पानोपानी खुलतसें

रंगदार छबी

थांबला पाऊस उजळे आकाश

सूर्य येई ढगांतून, उधळी

प्रकाश

किरण कोंवळे भूमीवरी आले

सोनेरी त्या तेजामध्यें

वस्तुजात खुले

सुस्नात जाहली धरणी हांसली,

वरुणाच्या कृपावर्षावाने

सन्तोषली

- शांता ज. शेळके

१२ मे, २०११

आमची बैलजोडी




आमच्याकडे दोन बैल जोड्या होत्या. त्यातली एक जोडी बाबांची खूप लाडकी. त्यांची नावं सायब्या- हावश्या. या सायब्या हावश्यांना कधीच कासरा लावला नाही. ते सारखे सगळ्या शेतात बाबांच्या मागे मागे फ़िरायचे. बांधाने चरायचे, पण कधीच चुकूनसुद्धा पिकाला तोंड लावायचे नाही. सगळ्यांना आश्चर्य वाटायचं, बाबा त्यांना खूप खूप जीव लावायचे. त्यांच्या प्रेमामुळेच ही जनावरं इतकी मानसाळली होती. बाबा दिसले नाही तर तर ते वेडेपिसे होत. सारखे ओरडत. बाबा आले की अगदी धावत धावत त्यांच्याकडे जात, त्यांचा हात जिभेने चाटायचे. मग बाबा देखील त्यांच्या अंगावरून हात फ़िरवायचे; मानेला खाजवायचे, कपाळावरून हात फ़िरवायचे, कुठे शेपटीला लागलेले लांडग्याचे काटे, गोखरू ईत्यादी काढून टाकायाचे. दर चार दिवसांनी बाबा त्यांना अंघोळ घालायचे; अगदी लहान मुलांसारखीच! दगडाने अंग घासून! 
दिसायलाही सायब्या- हावश्या खूप गोंडस!  कसं भरीव शरीर, तेलकट चाकलेटी काळपट  रंगाची त्वचा, बाकदार शींग. सायब्याच्या कपाळावर पांढरा पट्टा; अगदी गंध लावल्यासारखा! आणि तसाच पट्टा पाठीवर व कानाला. हावश्याच्या अंगावर काळा व पांढरा पट्टा. 
आमचा सगळ्यांचाच त्यांच्यावर विशेष जीव! मी तर त्यांच्या पोटाखालून ईकडुन तिकडे जायचो; पण कधी भीती वाटलीच नाही. बाबांच्या अंगाला कुणी झटायला लागलं की सायब्य़ा- हावश्या त्या माणसाच्या अंगावर धावून जायचे. त्यांचाही आमच्यावर विशेषत: बाबांवर खूप जीव!


एकदा असाच पोळ्याचा सण होता. सायब्या हावश्याला आम्ही खूप सजवलं होतं. जवळच तळ्यात नेऊन त्यांना अंघोळ घातली होती. आदल्या दिवशी त्यांची खांदमळनी झाली होती. शिंगाना बेगडं लावली होती. रंगानं रंगवलं होतं; परंतु त्यांच्या रंगामुळे इतर रंग त्यांच्या अंगावर दिसत नसे, फ़क्त पांढ-यावर गोल गोल झाकणाने मारलेले ठसे दिसायचे. अंगावर मस्त घुंगराची, छोट्या मण्यांची झूल असायची. शिंगांना शिंगोळे बसवायचे. गळ्यात मोठमोठ्या घागरमाळा. सगळंच अगदी हौशीने करायचो. दोघांची चाल पण ऎटदार! ईंद्राचा ऎरावत देखील असा चालत नसावा असंच मला वाटायचं!
बाबा त्यांना मारोतिच्या मंदीरासमोर दर्शनाला घेऊन गेले. गावातील इतर बैल सुद्धा आलेले होते. मानाचे तोरण तोडलं होतं. तेवढ्यात डफ़डं वाजायला सुरूवात झाली. आवाजाने बाजुला ऊभे असलेले दोन बैल ऊधळले, तसे ते बाबांच्या अंगावर आले. बाबा मागे सरकतांना खाली पडले. बाबा पडताच हावश्याने त्या बैलांना जोरात टक्कर मारली. सगळीकडे गोंधळ उडाला. ते बैल पळून गेले. बाबा ऊठून बाजुला ऊभे राहिले. सायब्या- हावश्याही जवळ आले. बाबांच्या अंगाला खेटायला लागले. मग बाबा म्हणाले,"अरे काही झालं नाही रे मला..." असं म्हणत त्यांच्या अंगावरून हात फ़िरवला. कदाचीत त्यांना स्पर्शातुन कळलं असावं. ते शांत झाले. सगळे लोक कौतुक करायला लागले. सगळ्यांना आश्चर्य वाटलं होतं. 
अश्या कितीतरी घटना आणि प्रसंग घडले होते की, ज्यातुन त्यांनी बाबांवरचं प्रेम व्यक्त केलं होतं.

दानवीर कर्ण




चौथ-यावर याचकांची
रांग लागली होती,
कुणास हवे होते सुवर्ण
कुणास पाहीजे मोती!

मुक्त हस्ताने दान दिले
याचक सर्व संपले,
चिंतेने व्याकुळ माता-पिता
वॄषालीसह आत परतले!

इतक्यात आला ईंद्र
दरिद्री ब्राम्हण होऊन,
मुखाचे बोळके चाळविले 
डोळे बारीक करून!

काय हवे ब्रम्हज्ञा?
संकोच नको मागण्या,
कर्णद्वार हे खुले
लौकीक सांगती चांदण्या!

खोटा तुझा हा दंभ
अन खोटा तुझा हा तोरा,
हवे मला जे कर्णा
ऎकुन थरथरेल चौथरा!

ब्राम्हण परतला मागे
अंगराज करी आर्जवे,
मस्तक ठेवीले चरणी
वॄषाली पुसती आसवे!

कवच कुंडले हवीय मजला
हात ब्राम्हणाने पसरले,
अर्जुनाच्या प्रेमासाठी
देवराज ईंद्र याचक झाले!

स्वर्गातील देवांचा राजा
मर्त्यलोकांत आला,
हात पसरूनी ऊभा ईथे
अन दान मागी कर्णाला!

चार दिशांच्या पलीकडची
पाचवी दिशाही हरली,
दिग्विजयी अंगराज कर्णाने
ईन्द्राची झोळी भरली!

कमरेच्या खडगाने
मुखात सारले पाते,
रक्ताच्या कारंज्यात
किर्ती कर्णाची दाटे!

देवेंद्राचे कटीवस्र
रक्ताने माखले,
सुर्यस्त्रोत्र म्हणत कर्णाने
कवच विलग केले!

वॄक्षाच्या सालीसम 
कवच कुंडले काढली,
रक्तवर्णी देह सोलला
ऊष्ण रक्तधारा लागली!

असह्य यातना चौथ-याला
माताही असह्य झाली,
वॄषालीचे दुखः पाहून
भोवळ शोनला आली!

रघू व्यवहारे,
११ मार्च २०११
औरंगाबाद.

०८ मे, २०११

कथा

अशी एक कथा आहे की, नालंदा विद्यापिठातल्या तीन विद्यार्थ्यांनी शेवटची परिक्षा देऊन टाकली होती. पण गुरू त्यांना जायला काही सांगत नव्हता. शेवटी एक दिवस एकानं विचारलं की आम्ही असं ऎकलं आहे की आमची शेवटची परिक्षाही झाली आहे.... पण ती झाली आहे असं दिसत्य नाही, कारण आम्हाला आता परत का जायला सांगत नाही. आम्हाला ईथे य़ेऊन वीस वर्षे झाली आहेत. घरचे लोक आता हयात आहेत अथवा नाही... आईबाप वयोवृद्ध आहेत... आमची परिक्षा पुर्ण झाली असेल तर आता आम्ही परत जावं का?

तेंव्हा गुरू म्हणाले की, आज संध्याकाळी तुम्ही जाऊ शकता!
पण शेवटची परिक्षा राहिली होती अन ती परिक्षा अशी होती की ती घेण्याजोगी नव्हती. त्यासाठी तर एका कसोटीतून पार व्हावं लागत असे.

संध्याकाळी ते तिघे विद्यार्थी निघाले. दूर असलेल्या एका नगरीत ते रात्री जाऊन ते विसावा घेणार होते. संध्याकाळ होऊ लागली. सुर्य मावळला. ते एका झाडापाशी आले.गुरू तिथेच लपून बसले होते. त्यांनी तिथल्या पाऊलवाटेवर काटे पसरून ठेवले होते. एक विद्यार्थी काटे ऒलांडून पुढे गेला. दुस-यानंही ऊडी घेतली. तिसरा तिथे थांबला आणि ते काटे ऊचलून झाडीत टाकू लागला.
ते दोघे म्हणाले की तू हे काय करतोयस? लौकरच अंधारून येईल. आपल्याला दूर जायचं आहे. रस्त्यात घनदाट अरण्य आहे. ते धोक्याचं आहे. हे काटे काय वेचत बसला आहेस?
पण तो तिसरा विद्यार्थी म्हणाला की, सुर्य मावळला आहे, लवकरच रात्र होईल. तेंव्हा आपल्यानंतर जो कुणी ईथे येईल, त्याला काहीच दिसणार नाही. या पाऊलवाटेवर आता आपल्यालाच काय ते दिसतं आहे. आता लौकरच अंधार पडेल, तेंव्हा हे सगळे काटे गोळा करावेच लागतील. तुम्ही पुढे व्हा, मी तुमच्या पाठोपाठ येईन.
ईतक्यात गुरू झाडीतून बाहेर आले. त्यांना पाहून ते तिघे चकीत झाले. गुरू म्हणाले की तुम्ही दोघं परत या. तुम्ही या परिक्षेत अयशस्वी झालेत. अजुन काही वर्षे तुम्हाला ईथे थांबावे लागेल. अन जो काटे ऊचलायला थांबला आहे तोच ऊत्तीर्ण झाला आहे. त्यानं आपल्या घरी जावं.

कॉलेज नावाच्या गुलमोहराखाली - मराठी कादंबरी पुढे चालू पान ३

मी एनसीसीत असल्यामुळे मला दर शनिवारी-रविवारी सकाळीच सहा वाजता परेडसाठी ग्राउंडवर हजर रहावे लागत होते. मी कँपला जायचे रद्द केले कारण कँपमध्ये जाऊन दहा दिवस रुक्षपणे परेड करण्यात व दहिने-बाये मुडण्यात घालवण्यापेक्षा गॅदरिंगमध्ये सहभागी होण्याचे ठरवले.
आमची गॅदरिंग .... नाही, मराठीतून स्नेहसंमेलन! तीन दिवस चाललं. त्यात पहिल्या दिवशी काव्यवाचन, कथाकथन, व वादविवाद स्पर्धा. दुस-या दिवशी सांस्कृतीक कार्यक्रम व नाटक आणि शेवटच्या दिवशी शेला पगोटेआणि आनंदनगरी. गॅदरिंग्साठी आमच्या लिमये सरांनी नाटक निवडले ’मद्राशीने केला मराठी भ्रतार’ त्यासाठी भंडारी मॅडमने बहुतेक पात्रांची निवड केली होती. मी मद्राशाची भूमिका केली होती.
खरंतर आम्ही सायन्सचे विद्यार्थी, वेळ कमी मिळायचा; परंतु आम्ही भंडारी मॅडम व सुळे मॅडम यांचे लाडके! त्यामुळे सांस्कृतीक कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा, मराठी वाड.मय मंडळाचे कार्यक्रम यात नेहमी आमची लूडबूड असे. सर्व कार्यक्रम व्यवस्थीत पार पडले होते. शेवटचा दिवस शेला पागोट्याचा असल्याने आम्ही सगळे ग्रूपने मागच्या बाजूस बसलो होतो. समोरच्या रांगेत सर्व प्राध्यापक, प्राचार्य, त्यानंतर मुली व अगदी मागे आम्ही. हॉलमध्ये छान सजावट केली होती. क्रेपपट्ट्या, प्लास्टीक बॉल, दरवाज्याशेजारी झाडांच्या आणि फ़ूलांच्या कुंड्या, सगळा हॉल प्रकाशीत झालेला. चॉकलेटी रंगाचे पडदे; सगळं च कसं छान सजलेलं. सगळंच रंगबेरंगी! ऊत्साहपुर्ण वातावरणात सगळेच आनंद लूटत होते. सतत कुणीतरी सारखं काहीतरी कॉमेन्ट्स करत होतं.
माझ्यावर सर्वाधिक फ़िश-पाँडस आले होते. त्यामुळे मला महाविद्यालयातर्फ़े मिस्टर पॉप्युलर घोषीत केले होते. मिस्टर पॉप्युलर घोषीत करण्यास फ़क्त सर्वाधिक फ़िश-पाँडस असावेत , एवढाच निकष नव्हता; तर सर्वात छान व ऊत्कृष्ट फ़िश-पाँड वरून सुद्धा मिस्टर पॉप्युलर निवडला जायचा. आमच्या ग्रूपमधल्याच बहूदा कुणीतरी हा फ़िश-पाँड लिहीला असावा.

प्रिय पुरू,
तू गेल्यापासून आईने एक वेळचे जेवन दोन वेळा घेण्यास सुरूवात केली आहे. बाबांच्या सिगारेटही व्यवस्थीत राहतात. ताईच्या मैत्रीणीदेखील नियमीत घरी येतात. आईची प्रकृती सुधारली आहे. तरी जिथे असशील तिथून आनखी दहा वीस किलोमीटर पुढे जा, कुणीही तुझ्यावर रागावणार नाही.

विशेष सूचना : हा कुणाला दिसल्यास अथवा सापडल्यास त्याला आणखी पुढे नेऊन सोडावे. चूकुन कुणी घरी आणून सोडल्यास, त्याला योग्य बक्षीस अर्थात बेदम मार देण्यात येईल.


बरं नुसताच कुणीतरी दुस-याने वाचला असता, तर कदाचीत ऊत्कृष्ट फ़िश-पाँड ठरलाही नसता; पण वाचायला भंडारी मॅडम, त्याही मराठीच्या; अगदी सगळेच स्वल्पविराम, अर्धविराम, पुर्णविराम व ईतर जी काही म्हणून विरामचिन्हे आहेत, ती सगळी वापरून, आवाजातील चढऊतारासह त्यांनी फ़िश-पाँड वाचला. कदाचीत तो लिहील्यापेक्षाही उत्कृष्ट वाचन झालं असावं. मग काय सगळीकडे प्रचंड हास्याचे फ़वारे! मी मनाशीच विचार करत स्टेजवरून फ़ूल घेऊन परतलो. सोबत टाळ्यांचा कडकडाट! पण ह्या टाळ्या माझ्यासाठी नव्हत्याच; त्या होत्या फ़िश-पाँडसाठी!
स्नेहसंमेलनाची नशा अजुनही ऊतरली नव्हती. मला येता-जाता मुली टाँट मारू लागल्या. मुलं काही फ़ारशी दखल घेत नव्हते. मुलांनी काय मुलांची दखल घ्यावी? पण मुली ... ब-याच जणींनी फ़िशपाँडवरून माझा छळ मांडला होता. "जा बाबा, अजून दूर जा." असं म्हणायच्या. मग मीही म्हणायच्व्हो,"घरी नेऊन सोडतेस काय?" वरून हसत हसत चालतं व्हायचं.

क्रमशः

कॉलेज नावाच्या गुलमोहराखाली - मराठी कादंबरी पुढे चालू पान २

सभागृहात आमच्या वर्गाची प्रवेश समीती बसलेली होती. त्यावेळी ज्योतिर्मयीची मैत्रीण दिसली होती.
"ए बाळू, ते बघ, आपल्या वर्गातल्या पोरी येताहेत, त्यांना बोलाव ना, त्यांची जरा मजा घेऊ." चप्प्या म्हणाला.
तोपर्यंत आम्ही कुठल्या वर्गात आहोत हे नवीन मुलामुलींना माहीतच नव्हतं. त्या दोघी आल्या. तसा ललीत व जोश्या जरा मोठेच वाटायचे. वयानंही आणि शरीरानंही. आरती, स्वाती, कवीता या अधूनमधून काहीतरी विचारायच्या,"काय नावं तुमची?" आरती म्हणाली.
त्या दोघी एक्मेकींकडे पहायला लागल्या.
तिची मैत्रीण म्हणाली, "सोनाली कुलकर्णी."
"अन तुझं गं"सतीश म्हणाला.
"ज्योतिर्मयी......"
मला इतर काहीच ऎकू आलं नाही. मी तिच्याकडे अगदी एकटक पाहत होतो. तिनं सगळ्यांकडे पाहतांना एक-दोनदा माझ्याकडे नजर फ़िरवली, मध्येच मला बाळूनं कोपरानं खुणवलं. मग त्यांना त्यांचा संपुर्ण परिचय मराठीतुन द्यायचा; अगदी कौटुंबीक पार्श्वभूमीसह, असं सांगितलं.
मग काय सगळंच मराठीतून, कसं शक्य आहे? तिच्या मैत्रीणीच्या पाच चूका झाल्या. केअर ऑफ़, फ़ोन, ऑफ़ीसर असे आणखी दोन शब्द तिनं वापरले. ज्योतिर्मयीनं बँक हा शब्द वापरल्यामुळे वाद सुरू झाला. तिचं म्हणणं होतं बँक हा शब्द मराठीत जसाचा तसा वापरतात. आमच्या ग्रूपचं म्हणणं होतं की, बँक हा इंग्रजी शब्द आहे. खरं तर तिचं म्हणणं बरोबर होतं, मराठीतून बँक या शब्दाला कुठला पर्यायी शब्द आहे, हे आम्हाला तरी कुठे माहीत होतं?
मला त्यातून एवढं मात्र समजलं की, तिचे वडील कुठल्या तरी बँकेत आहेत म्हणून. मग काय त्या दोघींनी चुकलेले शब्द दुस-या दिवशी शंभर वेळा लिहून आणायचे असं सांगितलं.
’मायक्रो-बायॉलॉजी’ हा विषय घेणा-या जास्तीत जास्त मुली. त्यातच तिचेही मायक्रो. आमचा जनरल ग्रूप.
दरम्यान त्यांची हजेरी होईपर्यंत माझं सगळं लक्ष तिच्याकडेच होतं. ती सारखी बोलत रहावी व मी असंच ऎकत बसावं, असं मला वाटलं. मला शांत पाहून चप्प्या म्हणाला, "बोअर झालं का?"
मी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही...... मला तिचं नाव खूप आवडलं होतं... ज्योतिर्मयी.... किती छान नाव! ती खूप छान बोलते. बोलतांना ती डोळ्यांची ऊघडझाप...
तिची मैत्रीण थोडी रागावलीच होती; पण ज्योतिर्मयीनं तिचा हात दाबला. कदाचित ती सोनालीला समजावीत असावी , की जाऊ दे गं, असंच होतं. असं मला वाटलं. तिच्या हातातला लाल - पिवळा दोरा नजरेसमोरून हलत नव्हता.
जेंव्हा पहिल्या दिवशी लेक्चरच्या वेळी त्यांनी आम्हाला क्लासमध्ये पाहिलं तेंव्हा ज्योतिर्मयी माझ्याकडे पाहून गालातल्या गालात हसली; पण सोनाली चक्क मारक्या म्हशीसारखी रागानं पाहू लागली. मग काय आम्ही तिच्या मैत्रीणीला सतत चिडवायचो. सुरूवातीच्या दिवसांत तर आमचे व तिच्या मैत्रीणीचे ऊंदरामांजरासारखे वैर निर्माण झाले होते.
सोनाली समोरून गेल्यामुळे सगळे प्रसंग जसेच्या तसे नजरेसमोर ऊभे राहीले.

क्रमशः

०७ मे, २०११

कॉलेज नावाच्या गुलमोहराखाली - मराठी कादंबरी अंश

डिसेंबर ऊजाडला होता.कॉलेजमध्ये सगळीकडे कसे ऊत्साही वातावरण पसरले होते. गुलाबी थंडी पडली होती. आमचे लेक्चर्स आणि प्रॅक्टीकल्स नियमीत चालू होते. त्यातच एन सी सी चा कॅम्प जाणार होता. त्या दरम्यान स्नेहसंमेलनास गैरहजर राहून कॅम्प अटेन्ड करावा की गॅदरिंगमध्ये सहभागी व्हावे, या विवंचनेत पडल्यामुळे मी पार गोंधळून गेलो होतो.
आमच्या कॉलेजचा परिसर अत्यंत मनमोहक व निसर्गसौंदर्याने नटलेला होता. कॉलेजच्या पाकिंगजवळच ऎतिहासीक मोगलकालीन दरवाजा. दरवाजाच्या आतल्या बाजूस दोन्हीकडेही बसण्यास जागा. सगळीकडे आसपास हिरवे-हिरवे...
छानच छान! अगदी निलगिरीपासून ते गुलमोहरापर्यंत... सगळी मोठीमोठी झाडं...वनस्पती ऊद्यान...रंगीबेरंगी फ़ुले...हिरवेगार... अर्थात कॉलेजातील हिरवळ असल्यामुळे सौंदर्याची वेगवेगळी मनमोहक रूपे पाहून मन आनंदून जात असे.
त्या दिवशी सकाळीच मी, ललीत, व चप्प्या कॉलेजमध्ये आलो. आम्ही सरळ कॅन्टीनमध्ये येऊन बसलो होतो. लेक्चर्स अजुन सुरू झाली नव्हते. ते सगळे प्रसंग अगदी जसेच्या तसे माझ्या नजरेसमोर ऊभे राहीले. आम्ही अकरावीपासून याच कॉलेजमध्ये होतो. नवीन आलेल्या विद्यार्थ्यांच्या मानानं आम्ही जरा सिनीयरच होतो.
सगळीकडे बरीच वर्दळ होती. सगळ्याच वर्गांची प्रवेश प्रक्रिया सुरू होती. अकरावीची प्रवेश समीती जिथे होती, तिथंच बाळू व सतीश दबा धरून बसलेले होते. नवीन येणा-या मुलींची नावे माहीत करणं; जमलं तर एखादं तरी पाखरू जाळ्यात अडकवावं, यासाठी त्यांनी तिथेच वेढा टाकला होता. बाहेरचा गड सांभाळायचं काम आमच्याकडे होतं, ते आम्ही ईमाने-ईतबारे सांभाळीत होतो; पण आजही कुणी काही विशेष दखल घेण्यासारखं दिसत नव्हतं. आम्ही थोडेसे कंटाळलोच होतो. काहीतरी नवीन करावं म्हणून आम्ही अकरावीच्या आणि फ़र्स्ट ईयरच्या नवीन विद्यार्थ्यांची अर्थात मुलींची परेड घ्यायची असं ठरंवलं. म्हणजे रॅगिंग नाही... बस्स, थोडसं छळायचं अन आपली सिनीयारिटी दाखवायची असंच ठरलं. मग हळूहळू जगदीश, बाळू, सतीश, ललीत , चप्प्या, जोश्या, बंडू, कवीता, स्वाती, आरती.... सगळेच जमले. आम्ही सगळ्यांनी मिळून कॉलेजच्या ईमारतीसमोरच, कारंजाच्या हौदाजवळ वेळूच्या बेटाशेजारी चक्रव्यूह रचला. येणा-या - जाणा-या विद्यार्थ्यांना बोलवायचं व तिथंच फ़िरकी घ्यायची.
आमचं ईकडे फ़िरकी घ्यायचं काम चालू असतांनाच समोरून एक मोठ्या केसांवाला हिरोटाइप मुलगा, सोबत एक गोंडस मुलगी, गप्पा मारत येत होते.
" ऎ पुरू, ते बघ...त्यांना बोलाव ना." बाळू माझ्याकडे पाहात म्हणाला.
’ चप्प्या दे रे आवाज."
चप्प्यानं त्यांना बोलावलं.
"काय नाव रे तुझं?" ललीतनं त्या मोठ्या केसावाल्या मुलाला विचारलं.
तेवढ्यात चप्प्या म्हणाला,"झिटाळ्या."
सगळेच हसले, तो थोडासा खट्टू झाला. त्याचा चेहरा पडला. ऊसनं अवसान आणीत तो म्हणाला, "अश्विनी."
’काय रे, बापाचं नाव सांगायला लाज वाटते का?"
जगदीश म्हणाला तेंव्हा तो अगदीच रडवेला झाला व म्हणाला, अश्विनीकुमार आण्णासाहेब गोळे."
"च्यायला नाव पण अगदी पोरींसारखंच आहे."
चप्प्या म्हणाला,"आर्ट्स की सायन्स रे?"
"सायन्स."
"ए, तो सायन्सचा आहे रे, त्याला जास्त छळू नका." जोश्या म्हणाला.
नंतर असंच त्याच्या सोबतच्या मुलीला तिचं नाव-गाव विचारलं व तिला गाणं गायला लावून चप्प्या म्हणाला,"तू एक काम करायचंस, ईथं बस...हां...ईथं.. अन हे बघ गं...तू ह्याच्या केसांची वेणी घालायची, अगदी त्या केनियन मुलीसारखी... साला केसं वाढवतो." असं म्हणत त्यांना कामाला जुंपलं. तो मुलगा ईकडे-तिकडे पाहात तिच्यासमोर बसला.
त्यानंतर बी.ए. च्या दोन मुलींना चक्क आदिवासी डान्स करायला लावला. ललीतनं हूडीबाबा, हुआबाबा, हुलालाला असं म्हणत स्वतः अंगविक्षेप करत पार्श्वसंगीत दिलं. असं करत आम्ही ब-याच जणांना छळलं. डान्स, गाणी, वेडेवाकडे अंगविक्षेप, एखाद्या पोराकरवी एखाद्या मुलीला फ़ूल द्यायचं. अशा वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्यांनी पार धूम केली.


क्रमशः

कविता

माझ्या गल्लितलं पाखरू 
एकदम छान दिसतं 
मटकत मुरडत चालतांना 
गालातल्या गालात हसतं! 

 नेहमीच वाटतं बोलावं तिच्याशी 
म्हणून मागे मागे जातो 
ऒळखीचं कुणी दिसलं 
 की आपला भलतीकडेच पहातो! 

 समोर आली की
 ती मुद्दामच हसते 
ही बया पाठमोरीसुद्धा
 किती छान दिसते! 

 हळूच पाहते वळून 
अन हसते गालातल्या गालात 
जीव होतो कासावीस 
 अन मी शिरतो खोलात! 

 कसं विचारू तिला 
 करशील का माझ्यावर प्रेम
 म्हणेल ती नाही 
ऊगीच तिचा नाही काही नेम!

रघुनाथदादा पाटील

०५ मे, २०११

दीप प्रज्वलन करण्याची प्रथा

वैवाहिक जीवनात पदर्पण करतांना एक सप्तपदी असते तशीच ती व्यवसायातही असते.
पहिलं पाऊल- शब्द
दुसरं - वेळ
तिसरं - तत्परता
चौथं - नजर
पाचवं - कौशल्य
सहावं - ज्ञान
सातवं - सातत्य
पत्करलेल्या व्यवसायात सातत्य टिकलं तर पहिल्या सहा पवलांना बळीच्या तीन पावलांची शक्ती प्राप्त होते.
ही बाब सतत लक्षात रहावी यासाठी दीप प्रज्वलन करण्याची प्रथा आहे असं मला वाटतं...

for more details : visit facebook page