०७ मे, २०११

कॉलेज नावाच्या गुलमोहराखाली - मराठी कादंबरी अंश

डिसेंबर ऊजाडला होता.कॉलेजमध्ये सगळीकडे कसे ऊत्साही वातावरण पसरले होते. गुलाबी थंडी पडली होती. आमचे लेक्चर्स आणि प्रॅक्टीकल्स नियमीत चालू होते. त्यातच एन सी सी चा कॅम्प जाणार होता. त्या दरम्यान स्नेहसंमेलनास गैरहजर राहून कॅम्प अटेन्ड करावा की गॅदरिंगमध्ये सहभागी व्हावे, या विवंचनेत पडल्यामुळे मी पार गोंधळून गेलो होतो.
आमच्या कॉलेजचा परिसर अत्यंत मनमोहक व निसर्गसौंदर्याने नटलेला होता. कॉलेजच्या पाकिंगजवळच ऎतिहासीक मोगलकालीन दरवाजा. दरवाजाच्या आतल्या बाजूस दोन्हीकडेही बसण्यास जागा. सगळीकडे आसपास हिरवे-हिरवे...
छानच छान! अगदी निलगिरीपासून ते गुलमोहरापर्यंत... सगळी मोठीमोठी झाडं...वनस्पती ऊद्यान...रंगीबेरंगी फ़ुले...हिरवेगार... अर्थात कॉलेजातील हिरवळ असल्यामुळे सौंदर्याची वेगवेगळी मनमोहक रूपे पाहून मन आनंदून जात असे.
त्या दिवशी सकाळीच मी, ललीत, व चप्प्या कॉलेजमध्ये आलो. आम्ही सरळ कॅन्टीनमध्ये येऊन बसलो होतो. लेक्चर्स अजुन सुरू झाली नव्हते. ते सगळे प्रसंग अगदी जसेच्या तसे माझ्या नजरेसमोर ऊभे राहीले. आम्ही अकरावीपासून याच कॉलेजमध्ये होतो. नवीन आलेल्या विद्यार्थ्यांच्या मानानं आम्ही जरा सिनीयरच होतो.
सगळीकडे बरीच वर्दळ होती. सगळ्याच वर्गांची प्रवेश प्रक्रिया सुरू होती. अकरावीची प्रवेश समीती जिथे होती, तिथंच बाळू व सतीश दबा धरून बसलेले होते. नवीन येणा-या मुलींची नावे माहीत करणं; जमलं तर एखादं तरी पाखरू जाळ्यात अडकवावं, यासाठी त्यांनी तिथेच वेढा टाकला होता. बाहेरचा गड सांभाळायचं काम आमच्याकडे होतं, ते आम्ही ईमाने-ईतबारे सांभाळीत होतो; पण आजही कुणी काही विशेष दखल घेण्यासारखं दिसत नव्हतं. आम्ही थोडेसे कंटाळलोच होतो. काहीतरी नवीन करावं म्हणून आम्ही अकरावीच्या आणि फ़र्स्ट ईयरच्या नवीन विद्यार्थ्यांची अर्थात मुलींची परेड घ्यायची असं ठरंवलं. म्हणजे रॅगिंग नाही... बस्स, थोडसं छळायचं अन आपली सिनीयारिटी दाखवायची असंच ठरलं. मग हळूहळू जगदीश, बाळू, सतीश, ललीत , चप्प्या, जोश्या, बंडू, कवीता, स्वाती, आरती.... सगळेच जमले. आम्ही सगळ्यांनी मिळून कॉलेजच्या ईमारतीसमोरच, कारंजाच्या हौदाजवळ वेळूच्या बेटाशेजारी चक्रव्यूह रचला. येणा-या - जाणा-या विद्यार्थ्यांना बोलवायचं व तिथंच फ़िरकी घ्यायची.
आमचं ईकडे फ़िरकी घ्यायचं काम चालू असतांनाच समोरून एक मोठ्या केसांवाला हिरोटाइप मुलगा, सोबत एक गोंडस मुलगी, गप्पा मारत येत होते.
" ऎ पुरू, ते बघ...त्यांना बोलाव ना." बाळू माझ्याकडे पाहात म्हणाला.
’ चप्प्या दे रे आवाज."
चप्प्यानं त्यांना बोलावलं.
"काय नाव रे तुझं?" ललीतनं त्या मोठ्या केसावाल्या मुलाला विचारलं.
तेवढ्यात चप्प्या म्हणाला,"झिटाळ्या."
सगळेच हसले, तो थोडासा खट्टू झाला. त्याचा चेहरा पडला. ऊसनं अवसान आणीत तो म्हणाला, "अश्विनी."
’काय रे, बापाचं नाव सांगायला लाज वाटते का?"
जगदीश म्हणाला तेंव्हा तो अगदीच रडवेला झाला व म्हणाला, अश्विनीकुमार आण्णासाहेब गोळे."
"च्यायला नाव पण अगदी पोरींसारखंच आहे."
चप्प्या म्हणाला,"आर्ट्स की सायन्स रे?"
"सायन्स."
"ए, तो सायन्सचा आहे रे, त्याला जास्त छळू नका." जोश्या म्हणाला.
नंतर असंच त्याच्या सोबतच्या मुलीला तिचं नाव-गाव विचारलं व तिला गाणं गायला लावून चप्प्या म्हणाला,"तू एक काम करायचंस, ईथं बस...हां...ईथं.. अन हे बघ गं...तू ह्याच्या केसांची वेणी घालायची, अगदी त्या केनियन मुलीसारखी... साला केसं वाढवतो." असं म्हणत त्यांना कामाला जुंपलं. तो मुलगा ईकडे-तिकडे पाहात तिच्यासमोर बसला.
त्यानंतर बी.ए. च्या दोन मुलींना चक्क आदिवासी डान्स करायला लावला. ललीतनं हूडीबाबा, हुआबाबा, हुलालाला असं म्हणत स्वतः अंगविक्षेप करत पार्श्वसंगीत दिलं. असं करत आम्ही ब-याच जणांना छळलं. डान्स, गाणी, वेडेवाकडे अंगविक्षेप, एखाद्या पोराकरवी एखाद्या मुलीला फ़ूल द्यायचं. अशा वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्यांनी पार धूम केली.


क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

for more details : visit facebook page