भर
उन्हात शेताकडे जातांना जीव कासावीस होत होता. उन्हाच्या झळाया लागून तोंड
पार कोमेजून गेलं होतं. रखरखीत .. सगळीकडे उघडा बोडखा माळ ..एखादं आंब्याच
झाड दिसत होतं. त्रिंबक पाटील झपझप वाट चालत होता. डोक्यात दुष्काळाशिवाय
कुठलाच विषय नव्हता.. जनावरांसाठी पाण्याची काय व्यवस्था करावी ह्या
विचारात गडी पार कासावीस झाला होता. कालच चा-याची ट्रक विकत घेतली , पण
पाण्यासाठी अजुनही वनवन चालूच होती.जेमतेम 4 ते 6
दिवस पाणी पुरणार होत..मग मात्र जित्राबं विकणं भाग होत..जिवापाड जपलेली
जनावरं विकायचा विचार करून त्रिंबक पाटील गोळामोळा होत होता..
शेतात येऊन जनावरांचं शेण पाणी करून तिथच आढ्याखाली बसला..हातात संकाडी घेऊन जमीन कोरू लागला ..मुंग्यांची रांग चाललेली निरखू लागला ..डोक्यात फक्त आणि फक्त कोरडाठक्क दुष्काळ घुसलेला ..
माणसं जगतील कशी तरी ..अण या जनावरांच काय? राहून राहून स्वत:ला एकच प्रश्न विचारत होता..हिंडून फिरून डोक्यातला दुष्काळ समोर जणू ठाण मांडून बसला होता..
दूरदूरपर्यंत नुसता कोरडा उघडा बोडखा माळ नजरेला टोचत होता ..
आगामी कादंबरीतून ..

रघुनाथदादा पाटील