०८ मे, २०११

कॉलेज नावाच्या गुलमोहराखाली - मराठी कादंबरी पुढे चालू पान ३

मी एनसीसीत असल्यामुळे मला दर शनिवारी-रविवारी सकाळीच सहा वाजता परेडसाठी ग्राउंडवर हजर रहावे लागत होते. मी कँपला जायचे रद्द केले कारण कँपमध्ये जाऊन दहा दिवस रुक्षपणे परेड करण्यात व दहिने-बाये मुडण्यात घालवण्यापेक्षा गॅदरिंगमध्ये सहभागी होण्याचे ठरवले.
आमची गॅदरिंग .... नाही, मराठीतून स्नेहसंमेलन! तीन दिवस चाललं. त्यात पहिल्या दिवशी काव्यवाचन, कथाकथन, व वादविवाद स्पर्धा. दुस-या दिवशी सांस्कृतीक कार्यक्रम व नाटक आणि शेवटच्या दिवशी शेला पगोटेआणि आनंदनगरी. गॅदरिंग्साठी आमच्या लिमये सरांनी नाटक निवडले ’मद्राशीने केला मराठी भ्रतार’ त्यासाठी भंडारी मॅडमने बहुतेक पात्रांची निवड केली होती. मी मद्राशाची भूमिका केली होती.
खरंतर आम्ही सायन्सचे विद्यार्थी, वेळ कमी मिळायचा; परंतु आम्ही भंडारी मॅडम व सुळे मॅडम यांचे लाडके! त्यामुळे सांस्कृतीक कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा, मराठी वाड.मय मंडळाचे कार्यक्रम यात नेहमी आमची लूडबूड असे. सर्व कार्यक्रम व्यवस्थीत पार पडले होते. शेवटचा दिवस शेला पागोट्याचा असल्याने आम्ही सगळे ग्रूपने मागच्या बाजूस बसलो होतो. समोरच्या रांगेत सर्व प्राध्यापक, प्राचार्य, त्यानंतर मुली व अगदी मागे आम्ही. हॉलमध्ये छान सजावट केली होती. क्रेपपट्ट्या, प्लास्टीक बॉल, दरवाज्याशेजारी झाडांच्या आणि फ़ूलांच्या कुंड्या, सगळा हॉल प्रकाशीत झालेला. चॉकलेटी रंगाचे पडदे; सगळं च कसं छान सजलेलं. सगळंच रंगबेरंगी! ऊत्साहपुर्ण वातावरणात सगळेच आनंद लूटत होते. सतत कुणीतरी सारखं काहीतरी कॉमेन्ट्स करत होतं.
माझ्यावर सर्वाधिक फ़िश-पाँडस आले होते. त्यामुळे मला महाविद्यालयातर्फ़े मिस्टर पॉप्युलर घोषीत केले होते. मिस्टर पॉप्युलर घोषीत करण्यास फ़क्त सर्वाधिक फ़िश-पाँडस असावेत , एवढाच निकष नव्हता; तर सर्वात छान व ऊत्कृष्ट फ़िश-पाँड वरून सुद्धा मिस्टर पॉप्युलर निवडला जायचा. आमच्या ग्रूपमधल्याच बहूदा कुणीतरी हा फ़िश-पाँड लिहीला असावा.

प्रिय पुरू,
तू गेल्यापासून आईने एक वेळचे जेवन दोन वेळा घेण्यास सुरूवात केली आहे. बाबांच्या सिगारेटही व्यवस्थीत राहतात. ताईच्या मैत्रीणीदेखील नियमीत घरी येतात. आईची प्रकृती सुधारली आहे. तरी जिथे असशील तिथून आनखी दहा वीस किलोमीटर पुढे जा, कुणीही तुझ्यावर रागावणार नाही.

विशेष सूचना : हा कुणाला दिसल्यास अथवा सापडल्यास त्याला आणखी पुढे नेऊन सोडावे. चूकुन कुणी घरी आणून सोडल्यास, त्याला योग्य बक्षीस अर्थात बेदम मार देण्यात येईल.


बरं नुसताच कुणीतरी दुस-याने वाचला असता, तर कदाचीत ऊत्कृष्ट फ़िश-पाँड ठरलाही नसता; पण वाचायला भंडारी मॅडम, त्याही मराठीच्या; अगदी सगळेच स्वल्पविराम, अर्धविराम, पुर्णविराम व ईतर जी काही म्हणून विरामचिन्हे आहेत, ती सगळी वापरून, आवाजातील चढऊतारासह त्यांनी फ़िश-पाँड वाचला. कदाचीत तो लिहील्यापेक्षाही उत्कृष्ट वाचन झालं असावं. मग काय सगळीकडे प्रचंड हास्याचे फ़वारे! मी मनाशीच विचार करत स्टेजवरून फ़ूल घेऊन परतलो. सोबत टाळ्यांचा कडकडाट! पण ह्या टाळ्या माझ्यासाठी नव्हत्याच; त्या होत्या फ़िश-पाँडसाठी!
स्नेहसंमेलनाची नशा अजुनही ऊतरली नव्हती. मला येता-जाता मुली टाँट मारू लागल्या. मुलं काही फ़ारशी दखल घेत नव्हते. मुलांनी काय मुलांची दखल घ्यावी? पण मुली ... ब-याच जणींनी फ़िशपाँडवरून माझा छळ मांडला होता. "जा बाबा, अजून दूर जा." असं म्हणायच्या. मग मीही म्हणायच्व्हो,"घरी नेऊन सोडतेस काय?" वरून हसत हसत चालतं व्हायचं.

क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

for more details : visit facebook page