सभागृहात आमच्या वर्गाची प्रवेश समीती बसलेली होती. त्यावेळी ज्योतिर्मयीची मैत्रीण दिसली होती.
"ए बाळू, ते बघ, आपल्या वर्गातल्या पोरी येताहेत, त्यांना बोलाव ना, त्यांची जरा मजा घेऊ." चप्प्या म्हणाला.
तोपर्यंत आम्ही कुठल्या वर्गात आहोत हे नवीन मुलामुलींना माहीतच नव्हतं. त्या दोघी आल्या. तसा ललीत व जोश्या जरा मोठेच वाटायचे. वयानंही आणि शरीरानंही. आरती, स्वाती, कवीता या अधूनमधून काहीतरी विचारायच्या,"काय नावं तुमची?" आरती म्हणाली.
त्या दोघी एक्मेकींकडे पहायला लागल्या.
तिची मैत्रीण म्हणाली, "सोनाली कुलकर्णी."
"अन तुझं गं"सतीश म्हणाला.
"ज्योतिर्मयी......"
मला इतर काहीच ऎकू आलं नाही. मी तिच्याकडे अगदी एकटक पाहत होतो. तिनं सगळ्यांकडे पाहतांना एक-दोनदा माझ्याकडे नजर फ़िरवली, मध्येच मला बाळूनं कोपरानं खुणवलं. मग त्यांना त्यांचा संपुर्ण परिचय मराठीतुन द्यायचा; अगदी कौटुंबीक पार्श्वभूमीसह, असं सांगितलं.
मग काय सगळंच मराठीतून, कसं शक्य आहे? तिच्या मैत्रीणीच्या पाच चूका झाल्या. केअर ऑफ़, फ़ोन, ऑफ़ीसर असे आणखी दोन शब्द तिनं वापरले. ज्योतिर्मयीनं बँक हा शब्द वापरल्यामुळे वाद सुरू झाला. तिचं म्हणणं होतं बँक हा शब्द मराठीत जसाचा तसा वापरतात. आमच्या ग्रूपचं म्हणणं होतं की, बँक हा इंग्रजी शब्द आहे. खरं तर तिचं म्हणणं बरोबर होतं, मराठीतून बँक या शब्दाला कुठला पर्यायी शब्द आहे, हे आम्हाला तरी कुठे माहीत होतं?
मला त्यातून एवढं मात्र समजलं की, तिचे वडील कुठल्या तरी बँकेत आहेत म्हणून. मग काय त्या दोघींनी चुकलेले शब्द दुस-या दिवशी शंभर वेळा लिहून आणायचे असं सांगितलं.
’मायक्रो-बायॉलॉजी’ हा विषय घेणा-या जास्तीत जास्त मुली. त्यातच तिचेही मायक्रो. आमचा जनरल ग्रूप.
दरम्यान त्यांची हजेरी होईपर्यंत माझं सगळं लक्ष तिच्याकडेच होतं. ती सारखी बोलत रहावी व मी असंच ऎकत बसावं, असं मला वाटलं. मला शांत पाहून चप्प्या म्हणाला, "बोअर झालं का?"
मी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही...... मला तिचं नाव खूप आवडलं होतं... ज्योतिर्मयी.... किती छान नाव! ती खूप छान बोलते. बोलतांना ती डोळ्यांची ऊघडझाप...
तिची मैत्रीण थोडी रागावलीच होती; पण ज्योतिर्मयीनं तिचा हात दाबला. कदाचित ती सोनालीला समजावीत असावी , की जाऊ दे गं, असंच होतं. असं मला वाटलं. तिच्या हातातला लाल - पिवळा दोरा नजरेसमोरून हलत नव्हता.
जेंव्हा पहिल्या दिवशी लेक्चरच्या वेळी त्यांनी आम्हाला क्लासमध्ये पाहिलं तेंव्हा ज्योतिर्मयी माझ्याकडे पाहून गालातल्या गालात हसली; पण सोनाली चक्क मारक्या म्हशीसारखी रागानं पाहू लागली. मग काय आम्ही तिच्या मैत्रीणीला सतत चिडवायचो. सुरूवातीच्या दिवसांत तर आमचे व तिच्या मैत्रीणीचे ऊंदरामांजरासारखे वैर निर्माण झाले होते.
सोनाली समोरून गेल्यामुळे सगळे प्रसंग जसेच्या तसे नजरेसमोर ऊभे राहीले.
क्रमशः
stories, marathi novels, screenplay, short films, movies
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
आकाशी रंग कुणी भलताच दंग मी बेभान माझा गगनात पतंग... माळावर उभा कसं तापलंय अंग दूर आकाशात गोत घेतोय पतंग.... मित्राच्या हातात चक्री ...
-
कादंबरी अंश... आज कुलकर्णी मॅडमने संतवाणी शिकवली. ’पापाची वासना नको दाऊ डोळा, त्यापरी आंधळा बरा मी’. संत तुकारामांची संतवाणी मला खूप आवडली. ...
-
Add caption माझं गाव तसं शहराजवळ. गावं टूमदार असतात असं फ़क्त पुस्तकात वाचायचंच. स्वातंत्र्यानंतर लोकशाही राज्ये ही संकल्पना राबविल...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा