१६ ऑक्टोबर, २०१३

निखारे...

चेह-यावरती हास्य,
अन पोटात द्वेषाचे सुरे....
मैत्रीच्या बुरख्याआड
लपलेत निखारे.....

मावळत्या दिनकरा पाहूनी,
मन सैरभैर झाले...
भिती वाटते आता मनाला,
नकोत हार तुरे......

चेहरे सुंदर असो
अथवा असो कुणी देखणे....
भिती वाटते आता मनाला,
आत लपलीत सैताने...

अश्रू दाटलेल्या हस-या डोळ्यात
दुखा:चे उमाळे लपलेले,
आनंद दाखवण्यासाठी
मुखमंडली हसू छापलेले...

रघुनाथदादा पाटील

११ ऑक्टोबर, २०१३

रे दयाघना!!

भुईवर माथा
लोचनात पयोधर
आत खोल अंतरात
दुखा:चे सरोवर...

राऊळी निर्मीक
हरवला ह्या गर्दीत
पायरिशी सोशीक
अन गहीवरला एकांत.....

अरे दयाघना
कधी येशील येशील
काळोखाच्या वेशीला
कधी दावशी कंदील....

नको लावू वेळ आता
असे फाटले आभाळ
आता तुच माझा वाली
कर तुच सांभाळ......

रघू व्यवहारे.
दि. 11 ऑक्टोबर 2013
औरंगाबाद.

०६ ऑक्टोबर, २०१३

Issue

तू प्रत्येक गोष्टीत वैताग शोधतोस...काही घडलं तर ते घडलं म्हणून, आणि नाही झालं तर तसं झालं नाही, का आणि कशामुळे ह्या विचाराने कासावीस होतोस....

अस्वस्थ राहणं.... आणि issue कुरवाळणं हा तुझा स्वभाव झालाय!
आता तो मरेपर्यंत बदलणं शक्य नाही, कारण तुझी ती गरज झालीय...


रघुनाथदादा पाटील

for more details : visit facebook page