२५ मे, २०११

दुस-याला नंबर एक मानणं मोठं कठीण!


दुस-याला नंबर एक मानणं मोठं कठीण!
मी असं एकलंय की गांधी गोलमेज परीषदेसाठी लंडनला गेले होते. अन त्यावेळी त्यांचा एक भक्त बरनॉर्ड शॉला भेटायला गेला, आणि त्यानं शॉंना विचारलं,"तुम्ही गांधीजींना महात्मा मानता की नाही?"
भक्तांना खूप काळजी असते की त्यांच्या महात्म्याला दुसरं कुणी महात्मा मानतं की नाही! कारण त्यांना स्वतःलाच त्याबद्दल खात्री नसते, तेंव्हा ते दुस-याकडून खात्री मिळवू पाहतात. त्याला हे विचारायची काही आवश्यकता नव्हती. परंतु त्यालाच स्वतःलाच त्याबद्दल शंका असावी. म्हणून त्याने बरनॉर्ड शॉ ला विचारले.
त्याला वाटलं शॉ किमान तोंडदेखलं तरी हो म्हणतील, नाही म्हणू शकणार नाही. शॉसारखे लोक शिष्टाचार नाही तर सदाचार पाळतात. शिष्टाचार म्हणजे ब-याच वेळा नाटक असतं.
शॉ म्हणाला," तुमचे गांधी महात्मा आहेत पण ते नंबर दोनचे!"
"नंबर दोनचे? मग नंबर एकचे कोण आहेत?
शॉ म्हणाला, " मी!"
शॉ पुढे म्हणाला हे बघा मी खोटं बोलू शकणार नाही. कारण मी कुणालाही स्वतःच्या आधी ठेऊ शकत नाही. मानूच शकणार नाही. ही वस्तुस्थिती आहे.
त्या भक्ताला वाटलं काय अहंकारी माणूस आहे हा!
पण शॉ खूप प्रामाणिक माणूस होता.
कुणीही स्वतःलाच नंबर एक मानत असतो, अगदी कुणीही!

अरबीत एक म्हण आहे की, परमात्मा जेंव्हा माणसाला बनवतो तेंव्हा त्याला जगात पाठवण्यापुर्वी तो त्याच्या कानात एक गंमत सांगतो,"तुझ्यापेक्षा चांगला माणूस मी कधी बनवलाच नाही."


1 टिप्पणी:

for more details : visit facebook page