तुमच्या कुटूंबियांसाठी सतत काहीतरी वेगळं करत रहा. त्यासाठी खूप खर्च करण्याची आजीबात गरज नाही. त्यामागचा विचार महत्वाचा आहे. तुम्ही त्यांच्याबद्दल प्राधान्यानं विचार केलात, एवढीच गोष्ट महत्वाची आहे.
तुमच्या कुटूंबाबरोबर एकजीव व्हा. त्यांच्याकडे व्यवस्थीत लक्ष पुरवा. आजच्या धावपळीच्या युगात आपल्याला हे शक्य वाटत नाही. हीच तुमची कसोटी आहे. त्याबद्दल व्यवस्थीत नियोजन करा.
परंतु कुटूंब म्हणजे फ़क्त बायको असं समजू नका.
ईतर लोक जे तुमच्यासाठी जे काही करताहेत ते त्यांच कर्तव्य आहे असं मुळीच समजू नका. ते असं चांगलं वागले नाहीत तरी त्यांचं काही बिघडणार नाही. ते तुमची काळजी करतात, किंवा त्यांना तुमच्याबद्दल काहीतरी वाटतं म्हणून ते छान वागतात. म्हणून त्यांनी जे काही केलं त्याची दखल घ्या. आपण काय केलं ते लक्षात नका ठेऊ. सबंध टिकवायचे असतील तर नेहमी सकारात्मक विचार करा.
आत्मकेंद्री वागण्याने आपण आपल्या लोकांपासून दूर जात आहोत ह्याचं भान ठेवा. आपण चांगलं वागायचं ते लोकं चांगले आहेत म्हणून नव्हे तर आपण चांगले आहोत म्हणून!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा