आज कुलकर्णी मॅडमने संतवाणी शिकवली. ’पापाची वासना नको दाऊ डोळा, त्यापरी आंधळा बरा मी’. संत तुकारामांची संतवाणी मला खूप आवडली. मला त्यांचं ’वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ हे भजन खूप आवडतं. आनंदाचे डोही आनंद तरंग; आमचे बाबा कायम अशी भजनं गुणगुणत असतात. रेडिऒवर देखील ब-याच वेळा लागतात ही भजनं. परंतु ही अशी भजनं आमच्या गावातल्या भजनी मंडळींना काही म्हणता येत नाही. मॅडमने वर्गात सगळ्यांना विचारलं," कुणाला एखादी कविता, भजन, भक्तिगीत काही येतं का?" तर त्यावेळी शिल्पानं ’निंबोनिच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई’ ही अंगाई गाऊन दाखवली. ती खूप छान गाते.
गाय झोपली गोठ्यात
घरट्यात चिऊताई
परसात वेलीवर
झोपल्या गं जाई-जुई
मिट पाकळ्या डोळ्यांच्या..... गाते तुला मी अंगाई...ह्या ऒळी मला खूप आवडल्या. आमच्यासाठी कधी कुणी अंगाई गायली नाही. पण किती छान आहे ना ही अंगाई! मॅडमनी टाळ्या वाजवल्या, तशा आम्हीही जोरजोरात टाळ्या वाजवल्या. सगळ्यांच्या टाळ्या वाजवनं बंद झाल्या तरी माझ्या टाळ्या वाजवनं सुरूच! सगळेच माझ्याकडे पाहू लागले. मला समजलंच नाही. मग मात्र मला चांगलंच ऒशाळल्यासारखं झालं! बाळू मला कोपराने टोचू लागला. शिल्पा खूप खूष झाली होती! किती सुंदर दिसते ना ती! मी दिवसभर हीच अंगाई गुणगुणत होतो. शिल्पाच्या बेंच जवळून जातांना देखील मी गुणगुणत होतो. तिनं ऎकलं , तशी ती हसली. खूप छान हसली. माझ्या पोटात मोठ्ठा खड्डा पडला.
रघू व्यवहारे यांची आगामी कादंबरी...

पावसाचे दिवस असल्याने रोज कसं अंधारून येत होतं. ढगांची आकाशात जत्रा भरायची. अधून मधून पांढुरके ढगांचे पुंजके एकडून तिकडे प्ळायचे. मला असं वातावरण खूप आवडायचं. कधी कधी सोसाट्याचा वारा देखील सुटायचा. पावसाचे टप्पोरे थेंब शाळेच्या पत्र्यावर तांडव करायचे. अशा वेळी अभ्यासात लक्षच लागत नव्हतं. खिडकीतून पावसाच्या सरी दिसायच्या. असं वाटायचं समोरच्या वरांड्यात उभं राहून हातात धारा पकडाव्या. काळे सर स्वतः देखील खिडकीजवळ ऊभे राहून पाऊस पहात हरवून जायचे! खिडकीजवळ जायला मिळावं किंवा बाहेर वरांड्यात जायला मिळावं अशी मनापासून ईच्छा होत होती. पावसाचा जोर वाढला. वारा थांबला होता. मागच्या बाजूला पत्रे गळायला लागली, तसा आमचा वर्ग गळकाच होता. मागे मुलांच्या जागेवर आणि सरांच्या टेबलावर गळायचं. एवढं निमीत्त आम्हाला जागेवरून ऊठायला पुरेसं ठरलं. मागे मुलांचा गोंधळ सुरू झाला. मी आणि अनिलनं ऊठून टेबल बाजूला सरकवला आणि तसेच दरवाजाशेजारी ऊभे राहीलो.सरांनी मुलांना पुढे-पुढे सरकायला सांगितलं. सरांचं लक्ष नाही असं पाहून मी बाहेर जाऊन पनाळाखाली हात धरला. हात ओला झाला. अंगातोंडावर देखील पाण्याचे तुषार पडले; लगेच पुन्हा वर्गात आलो, तरी देखील सरांनी पाहीलेच. सर नुसतेच हसले. मग ईतर मुलांनाही थोडा धीर आला.व ते ऊठून खिडकीतून पाऊस पाहू लागले. एक दोघं बाहेर गेले, हळू-हळू सगळा वर्ग वरांड्यात आणि खिडकीजवळ जाऊन ऊभा राहीला.
उत्तर द्याहटवावर्ग गळका असण्याचा असा देखील फ़ायदा होतो हे आमच्या शिवाय कुणालादेखील कळणारं नव्हतं!
शाळेच्या समोर आणि मागे मैदानावर पावसाचे पाणि वाहू लागले. पाण्याचा रंग चहासारखा झाला. माती मिसळल्याने पाण्याचा रंग बदलला. सर म्हणाले,"बघा पाणी ऊताराच्या दिशेने वहातंय."
एवढं तर आम्हालाही दिसत होतं, परंतु सर काहीतरी.........
क्रमशः
माझ्या आगामी कादंबरीतून...
रघू व्यवहारे,
औरंगाबाद.
०५/०८/२०११