१६ सप्टेंबर, २०२०

अर्थव्यवस्था गेली तेल लावत! कंगनाचा मुद्दा महत्वाचा!


अर्थव्यवस्था गेली तेल लावत! कंगनाचा मुद्दा महत्वाचा

तिच्या मुद्द्याचा सर्व जनतेच्या जगण्याशी संबंध आहे?हा कसला जबाबदार मेडिया आणि सरकार

इलेक्ट्रॉनिक मेडिया विरुद्ध आंदोलन करावयाचे आहे. एवढे सजग पत्रकार आणि जागरूक माध्यमे काम करताहेत आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून! किती अभिमानास्पद बाब आहे ही! (इथे उपरोध आहे हे लक्षात घ्यावे

कोविड १९ चा वाढता प्रादुर्भाव, अर्थव्यवस्था गाळात रुतलेली, महात्मा फुले जनआरोग्य योजनेत चालू असलेला भ्रष्टाचार, बेरोजगारी चे उग्र भयंकर रूप, आधीच नोटबंदी आणि जी एस टी ने कंबरडं मोड्लेलं, चार महिन्याचे लॉकडाउन असे कितीतरी प्रश्न आमच्या जगण्याचे लचके तोंडात असताना, माणसाला जगन अवघड होत असताना आमचा मेडिया विशेषतः इलेक्ट्रॉनिक मेडिया जे दाखवतोय आणि जसा किंचाळत ते पाहून किळस येते आणि हतबलता वाढत जाते! पुढे काय वाढून ठेवलाय ते कळत नाही. कशावरही प्रश्नचिन्ह लावून हि जमात काही फुटकी भांडी एकत्र करून आदळआपट करायला लागते आणि त्याला चारचा म्हणून चघळत बसते हे काय आहे ते कळायला फार विद्वान असायची गरज नाहीये

सरकार पुरस्कृत बातम्या आणि माध्यमे हा कळीचा मुद्दा आहे

जनता हतबल आहे. वीज बिल वाढत आहे, आरोग्य सुविधा नाहीत वरून त्यात लुबाडणूक चालू आहे. हातास काम नाही. खाद्य तेल महागले आहे. शिक्षणाचा खोळंबा झालाय. घाबरलेली जनता अजूनच हताश झालीय. अशा वेळी समाजमन समजून उपाययोजना करणे हे लोकनियुक्त सरकारचे काम असायला हवे होते! पण तसे होताना दिसत नाही. भयंकर काळ आलाय हे मात्र खरे




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

for more details : visit facebook page