२० ऑक्टोबर, २०११

माझा जानी दुश्मन- भाग एक


मी फ़ेसबूकवर अपडेटस चेक करत होतो. मित्रांच्या अपडेटसला 'like' करत. असे पंचविस-तीस ’like' दहा-वीस छान असे कमेंटस आणि भन्नाट, लय भारी यासोबतच ग्रेट असे टाईप करत बसलेलो. खरंतर ह्या सगळ्याचा देखील कंटाळा आलाय. दोघातिघांचे वाढदिवस फ़ेसबूकने आठवन करून दिले, त्यांच्या वॉलवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या; त्याही कुठूनतरी कॉपी करून पेस्ट करायच्या.
                मुलीचा सुंदर फोटो असला की ’वन अपॉन कॉस सी’ असं टंकायचं. जॉमेट्रीतलं ट्रिग्नॉमेट्री ज्यांना माहीत आहे त्यांना हे कळायचं.
               फ़ेसबूकमुळे जबरदस्तीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सारखं वाटतं. खरंतर सगळ्यांचे वाढदिवस लक्षात ठेवणं अवघड आहे परंतु फ़ेसबूकमुळे ते जरा सोपं झालं; पण साली सगळी मजाच निघून गेली. पाच-पन्नास शुभेच्छा मध्ये आपली शुभेच्छा कुठेतरी एका कोप-यात पडल्यासारखी! त्यावर ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्यानं एकतर ’like' किंवा thanks टंकावं. सालं सगळं कसं ड्युटी असल्यासारख.
              काही ग्रूप जॉईन केलेले. ग्रूपवर कार्यरत असलेली मंडळी काहीतरी लिहिणं बंधनकारक असल्यासारखी सारखी काहीतरी लिहीत असतात, अगदी भाकरी थापल्यासारख्री! चुटकीसारखी साहित्य निर्मीती करणारी. मग ते काहीही असो. अन बाकी सगळे त्याला ’like' करतात. सगळाच आव आणलेला! मग ज्याने लिहीलं ही त्याची जबाबदारी ठरते की त्याने परतफ़ेड करावी. दिवाकरांनी एका नाट्यछटेत लिहील्याप्रमाणे. तुम्ही मला चांगले म्हणा, मी तुम्हाला चांगले म्हणेन! माहीत नाही किती मनापासून असतं आणि किती संकेत पाळण्यासाठी?
सगळेच काहीबाही लिहीतात असं नाही, काही मंडळी छान लिहीतात, परंतु त्यांचं ही लिखान असंच यात कुठेतरी हरवलेलं.  मुलींच्या अगदी पाचकळ फ़ुटाण्यांना टीन-एजरपासून वयस्कांपर्यंत सगळ्यांचेच 'like' आणि कमेंटस मिळत असतात.
               मला आजकाल सोशल नेटवर्किंगचा कंटाळा येतोय. तेवढ्यात माझा जानी-दुश्मन आला. अगदी घाईतच. नेहमीप्रमाणे!
  "चल ना लवकर तयार हो, आपल्याला जरा जाऊन यायचंय." तो म्हणाला.
 कुठे, काय हे विचारायच्या भानगडीत न पडता मी कम्प्यूटर शट-डाऊन केला आणि कपडे बदलून तयार झालो. तोपर्यंत वहिणीने चहा बनवला. आज ह्याला चहा ईथे घरी नव्हता घ्यायचा, थर्मॉस्फ़्लास्कमध्ये भरून घेतला, आणि आम्ही त्याच्या पल्सरवर निघालो.
                 "तू मला सांगणार आहेस का, आपण कुठे चाललो म्हणून?" मी म्हणालो.
                "तू बस रे, आत्ता पोहचूच आपण."
सरळ आम्ही आकाशवाणी चौकात सिग्नलवर एका बाजूला बिग बाजार समोरच्या पार्किंगकडे वळलो.
            "बिग बाजार मध्ये जायचंय? काय घ्यायचं? ईथं काय चहा भेटत नाही का रे?"
   माझी बड-बड न ऎकता त्यानं गाडी पार्कींगमधे लावली. अन सिग्नल कडे निघाला.
       "ईकडे कुठे चाललो आपण?"
       " ..........................."
       " अरे काही तं बोल."
 तरीही तो डावी-ऊजवीकडे पहून रस्ता ओलांडून वाहतूक पोलिसाजवळ पोहोचला. मीही रस्ता ओलांडला.
त्यानं थर्मॉसफ़्लास्कमधला चा कपात ओतला आणि त्या वाहतूक पोलिसाला दिला.
   मी एकदम अवाक!
  तो पोलिसही थोडा गोंधळला. तो आमच्याकडे वेगळ्याच नजरेनं पाहू लागला.
मला थोडं वेगळंच वाटलं. वाटलं ह्याला कधीतरी सिग्नलवर पकडलं असावं, त्यांनी ह्याची गाडी तशीच पैसे न घेता सोडली असेल. त्यामुळे...
""चहा घ्या ना काका." जानी-दुश्मन म्हणाला.
त्यांनी चहा हातात घेतला परंतु त्यांची नजर आजु-बाजूला कसला तरी शोध घेत होती. नजरेत संशय दाटलेला.
"काय स्टिंग ऑपरेशन करत नाही ना? नायतर मायला आमची व्हायची गोची."
"नाही हो काका, तसं काहीही नाही." मी म्हणालो.
" नाही हो, आजकाल कुणी स्वार्थाशिवाय चांगलं वागायला लागला की संशय यायला लागतो. सवयच नाही राहीली. त्यातल्या त्यात आम्ही पोलिसवाले."
"तुम्ही दिवसभर असे ईथे ऊभे असता ते जनतेसाठी. भलेही त्यासाठी पगार मिळत असेल; परंतु बारा-बारा तास सतत असं ऊभं रहायंचं; त्यातूनही सगळे पोलिसांवरच रोष व्यक्त करतात. नजरेत तिरस्कार. जसे सगळेच भ्रष्टाचारी आहेत! आमच्यासाठी तुम्ही एवढं करतात, आम्ही थोडीशीदेखील परतफ़ेड केली, तुमच्यावर देखील माणूस म्हणून प्रेम केलं, तुमची काळजी केली तर तुम्हालाही उभं रहायला देखील बळं येयील. समाजाला आपणही हवेसे आहोत ही भावनाच एखाद्याला बदलू शकते. आणि हा धन्यवाद म्हणण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.
वाहातूक पोलिसानं चहा घेतला. त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं! त्यांनी माझ्या जानी दुश्मनाला कडकडून मिठी मारली. भावनेनं ओथंबलेली गळा भेट पाहून मी अगदी सदगदीत झालो.
  सालं फ़ेसबूकवरच्या रोजच्या शेकडो 'like' पेक्षा असं एखादं 'like'  जगण्यास नवी उर्मी मिळवून देतो.
हे खरं सोशल नेटवर्किंग! आपण देखील रोज असं एखादं 'like' क्लिक करावं असं वाटलं.
     माझं मन कसं काठोकाठ भरलेलं. फ़ेसबूकवर जणू मलाच नागडं करून माझा फ़ोटो अपलोड केलेला अन सगळे त्याला ’like' करताहेत. किती खूजे आहोत ह्याच्यासमोर आपण! माझी मलाच विकॄत प्रतिमा वेळोवेळी दाखवतो. म्हणूनच मी ह्याला जानी दुश्मन म्हणतो.
     मला ह्याच्या मैत्रीचा अभिमान वाटतो; अगदी सार्थ अभिमान!
त्या वाहतूक पोलिसाला तसाच भावनाविवश अवस्थेत सोडून आम्ही लगेच परत निघालो.
क्रमशः

माझी एक कथा
रघुनाथदादा पाटील

 

             

८ टिप्पण्या:

  1. great story...
    thodakyatach...pan mahatvacha...
    pratyekala hya goshtichi janiv zalich pahije...
    uttam lekhani...
    समाजाला आपणही हवेसे आहोत ही भावनाच एखाद्याला बदलू शकते...

    उत्तर द्याहटवा
  2. हे खरं सोशल नेट्वर्किंग आणि हेच खरं लाईक करणं. फेसबुकवर केल्या जाणा-या दादेच्या हजार कॉमेंट्सपेक्षा ही जिवंत कॉमेंट जास्त आवडण्यासारखी. आणि असा "जानी दुश्मन" मित्र असणं हे सुद्धा केवढं छान.!

    उत्तर द्याहटवा
  3. chaan lihilas ..

    facebook book chya yugaat aapni kiti krutrim ani virtual zaloy ki aaplya aaspaas kaay challay hyachya aaplyala kahi bhaan rahat nahi ..

    उत्तर द्याहटवा
  4. @ amey
    @ mayuri
    @ balaji
    @ nabandh
    तुम्हा सगळ्यांचे मनःपुर्वक धन्यवाद!
    असे कौतुकाचे शब्द लिहीण्यास बळ देतात.
    जग अजुनही चांगलं आहे ह्याची प्रचिती देतात.

    उत्तर द्याहटवा
  5. raghu, tu chhan wyakt kelya bhawana ... fb aata mi pan kama purtech waparte.. toch toch pana kantala aalay......
    chhanach sarv lihilay...
    mazyamana e prakashanasathipan lihit jashil ka?

    anagha hiray

    उत्तर द्याहटवा
  6. हे खरं सोशल नेट्वर्किंग! हेच खरं लाईक करणं. माणसाला माणूस समजणं हेच खरं सोशल नेटवर्किंग! असा "जानी दुश्मन" मित्र असणं हे सुद्धा केवढं छान.! आजपासून तुम्ही आमचे जानी दुश्मन!
    जानी दुश्मन ला त्रीवार salaam!

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. हे खरं सोशल नेट्वर्किंग! हेच खरं लाईक करणं. माणसाला माणूस समजणं हेच खरं सोशल नेटवर्किंग! असा "जानी दुश्मन" मित्र असणं हे सुद्धा केवढं छान.! आजपासून तुम्ही आमचे जानी दुश्मन!
      जानी दुश्मन ला त्रीवार salaam!

      हटवा

for more details : visit facebook page