"शिवा म्हणाला होता एकदा, की हे म्हातारे असेच गप्पा मारत असतात. साले मंदीराबाहेर बसून असे चाळे करतात, त्यांना वाटतं पोरं लहान आहेत; ह्यांना काय कळतं? अन मग काय हे असेच बोलतात. साले आत्ता असे आहेत, जवानीत कसे असतील?" मी म्हणालो.
ते तर विचारूच नको. आमचे नाना म्हणतात,"सांडू तात्या, कारभारी आबा, सुताराचा दामू अन बाळ्या म्हातारं ही चौकडी लय षौकीन! त्यांनी एक तमाशा सोडला नाही. सांडू तात्यानं तर केळीच्या पट्टीत असणा-या झोपडीत एक बाई आणून ठेवली होती. अन कारभारी आबानं तर वाडीला एक रंडकी बाई ठेवली होती. आबा कायम वाडीलाच असायचे. सगळ्या गावाला माहीत होतं" बाळू म्हणाला.
बाळ्याला असल्या बाबतीत भरपूर ज्ञान प्राप्त आहे.
मोठ्या मंडळींच्या बोलण्यातून आमचं सामाजीक ज्ञान वाढत होतं. पोरं लहान आहेत त्यांना काय कळतं असं समजून सगळंच ज्ञान; अगदी लैंगीक ज्ञानापासून ते एखाद्याचा इतिहास किंवा दुकानदाराच्या विधवा बहिणीचा इतिहास भूगोल अशी सगळी माहीती मिळत होती.या सगळ्या ज्ञानाची भर पडून आम्हीही सगळ्याच बाबतीत परिपक्व होत होतो.
एकदा हापशीवर आम्ही पाणी प्यायला गेलो होतो. तेंव्हा शबाना भाभी, सकीना, दुकानदाराची बहीण मंगलमावशी पाणी भरत होत्या. त्या सगळ्याच हसत होत्या. त्या मिल्ट्रीमॅन बाबू बद्दल काहीतरी बोलत होत्या.आम्ही एवढंच ऎकलं ’बाई लय मोठा हाये त्याचा’. आमच्याकडे पाहून सकीना भाभी म्हणाली,"ए बच्चे आगये. अब जरा खामोश भी रहो."
बाळू म्हणाला,"तुला कळलं का त्या काय बोलत होत्या ते?"
"बाबूबद्दल?" मी म्हणालो.
"बाबूबद्दल नाही, त्याच्या सामानाबद्दल बोलत होत्या त्या." असं म्हणून बाळू हसायला लागला.
"चल, काहीतरी फ़ेकतो. साल्या, तुझ्या डोक्यात शेन भरलय. सारखं असंच काहीतरी चालू असतं तुझ्या डोक्यात." मी म्हणालो.
सकीना भाभी दिसायला एकदम भारी! गोरी-गोरीपान! एकदम भरलेल्या शरीराची! त्या हापसा मारत असतांना वाकल्या तेंव्हा माझी नजर त्यांच्या गळ्याखाली थांबली. माझी छाती जोरजोरात धडकायला लागली. मी कावरा-बावरा झालो. भाभी माझ्याकडेच पाहत होत्या. त्यांनी मला असं पाहाताअंना पकडलं अन गालातल्या गालात हसल्या. तरीही त्यांनी काही झाकायचा प्रयत्न केलाच नाही. त्या टक लावून पाहात होत्या.
सालं काय चुकतं त्या म्हाता-यांचं? बाळूनं अन रामूनं माझ्याकडे अन मी त्यांच्याकडे पाहीलं. आम्ही नजरा वळवल्या. खाली पाहून दोन घोट पाणी प्यायलो. मंदीराजवळ येऊन बसलो. त्यांचं खिदळंणं अजुन चालूच होतं. म्हाता-यांच्या नजरा अजुनही कसलातरी वेध घेत होत्या. डोक्यातून सकीना भाभी काही जात नाव्हती.
क्रमशः
रघुनाथदादा पाटील यांच्या आगामी कादंबरीतून.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा