अशी एक कथा आहे की, नालंदा विद्यापिठातल्या तीन विद्यार्थ्यांनी शेवटची परिक्षा देऊन टाकली होती. पण गुरू त्यांना जायला काही सांगत नव्हता. शेवटी एक दिवस एकानं विचारलं की आम्ही असं ऎकलं आहे की आमची शेवटची परिक्षाही झाली आहे.... पण ती झाली आहे असं दिसत्य नाही, कारण आम्हाला आता परत का जायला सांगत नाही. आम्हाला ईथे य़ेऊन वीस वर्षे झाली आहेत. घरचे लोक आता हयात आहेत अथवा नाही... आईबाप वयोवृद्ध आहेत... आमची परिक्षा पुर्ण झाली असेल तर आता आम्ही परत जावं का?
तेंव्हा गुरू म्हणाले की, आज संध्याकाळी तुम्ही जाऊ शकता!
पण शेवटची परिक्षा राहिली होती अन ती परिक्षा अशी होती की ती घेण्याजोगी नव्हती. त्यासाठी तर एका कसोटीतून पार व्हावं लागत असे.
संध्याकाळी ते तिघे विद्यार्थी निघाले. दूर असलेल्या एका नगरीत ते रात्री जाऊन ते विसावा घेणार होते. संध्याकाळ होऊ लागली. सुर्य मावळला. ते एका झाडापाशी आले.गुरू तिथेच लपून बसले होते. त्यांनी तिथल्या पाऊलवाटेवर काटे पसरून ठेवले होते. एक विद्यार्थी काटे ऒलांडून पुढे गेला. दुस-यानंही ऊडी घेतली. तिसरा तिथे थांबला आणि ते काटे ऊचलून झाडीत टाकू लागला.
ते दोघे म्हणाले की तू हे काय करतोयस? लौकरच अंधारून येईल. आपल्याला दूर जायचं आहे. रस्त्यात घनदाट अरण्य आहे. ते धोक्याचं आहे. हे काटे काय वेचत बसला आहेस?
पण तो तिसरा विद्यार्थी म्हणाला की, सुर्य मावळला आहे, लवकरच रात्र होईल. तेंव्हा आपल्यानंतर जो कुणी ईथे येईल, त्याला काहीच दिसणार नाही. या पाऊलवाटेवर आता आपल्यालाच काय ते दिसतं आहे. आता लौकरच अंधार पडेल, तेंव्हा हे सगळे काटे गोळा करावेच लागतील. तुम्ही पुढे व्हा, मी तुमच्या पाठोपाठ येईन.
ईतक्यात गुरू झाडीतून बाहेर आले. त्यांना पाहून ते तिघे चकीत झाले. गुरू म्हणाले की तुम्ही दोघं परत या. तुम्ही या परिक्षेत अयशस्वी झालेत. अजुन काही वर्षे तुम्हाला ईथे थांबावे लागेल. अन जो काटे ऊचलायला थांबला आहे तोच ऊत्तीर्ण झाला आहे. त्यानं आपल्या घरी जावं.
असं आजच्या युगात झालं तर.....
उत्तर द्याहटवाSuekh Bodh kathaa
उत्तर द्याहटवा