१९ ऑक्टोबर, २०२०






राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि हेक्टरी ५०,००० रुपयांची मदत करावी 

- रघुनाथदादा पाटील (जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी, औरंगाबाद)


राज्यात पावसाची सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली; आणि मोठ्या प्रमाणात सोयाबीनची उगवण झाली नाही. याबाबत राज्यभर तक्रारी आल्यानंतर बियाणे त्याच्या कंपन्यांची चौकशी करण्यात आली होतीआणि बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे उगवण शक्ती कमी होती, त्यामुळे शेतकऱ्याला दुबार पेरणी करावी लागली, हे सत्य आहे.

त्यानंतर अनेक भागात दुबार पेरणी झाली, सोयाबीन सोबतच मुग, उडीद हे पिके बऱ्यापैकी आले होते, परंतु यावर्षी गेल्या दोन महिन्यात जोरदार वादळी पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेली पिके कापणी करण्यापूर्वी खराब झालीत. विदर्भ, मराठवाडा इतर भागात सोयाबीन वर येलो मोजाक नावाची कीड आल्यामुळे सोयाबीनला लागलेल्या शेंगा भरल्याच नाहीत, ही वास्तविकता आहे. विदर्भ मराठवाडा या भागात सोयाबीनचे उत्पादनचे (उतार) प्रमाण ही निम्म्यापेक्षा कमी येत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे

गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र इत्यादी भागातील कपाशीचे बोंड (पिक) सडण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. विदर्भातील संत्रा पिकाचे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पूर्व विदर्भात ऑगस्ट महिन्याच्या शेवटी मानव निर्मित पूर आल्यामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली आली होती, तसेच गावातील नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यांनाही पूर्ण पणे मदत मिळालेली नाही. जेथे मिळाली ती फारच तुटपुंजी आहे. एकूणच राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती विदारक आहे. त्यामुळे सरकार कडून शेतकऱ्यांना मदत मिळणे अतिशय गरजेचे आहे, म्हणून रघुनाथदादा पाटील ह्यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टी औरंगाबाद ने मुख्यमंत्र्याना जिल्हाधिकार्यामार्फत आज निवेदन दिले


प्रमुख मागण्या


. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा,

. प्रती हेक्टर दिल्ली सरकार प्रमाणे ५० हजार रुपये मदत जाहीर करावी

. कपाशीचे पंचनामे करून अहवाल सादर करावेत,

. सोयाबीन, धान कपाशी खरेदी हेतू सरकारी यंत्रणा उभी करावी

   (मिनिमन सपोर्ट प्राईस नुसार सरकारी खरेदी चालू करावी)

. पूर्व विदर्भात मानव निर्मित पूरामुळे झालेल्या नुकसानभरपाई कोकणाप्रमाणे मदत करण्यात यावी.

. राज्यात जेथे जेथे फळबागांचे नुकसान झाले आहे, तेथे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी.


शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती विचारात घेता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून वरील मागण्या तातडीने मान्य कराव्यात अशी मागणी या वेळी करण्यात आली

यावेळी सोबत सदाशिव पाटील, अजबराव मानकर, रवींद्र जायभाये, रवींद्र पाटील, अंबादास काळे, सुदर्शन बारवाल, मजाझ खान आणि शेतकरी हजर होते


सदर बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध व्हावी अशी विनंती

धन्यवाद !






























कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

for more details : visit facebook page