तुच सांग ग सांग पुन्हा
कसा तुला मी लाऊ लळा,
कमनीय तुझा हा रेशीमबांधा
-हदयात माझ्या ऊठती कळा!
भुरभूरणा-या तुझ्या बटांची
गर्दी झाली भालावरती,
रसरशीत हे ऒठ तुझे
अन ईवलिशी हनुवटी!
ऊभार तुझे हे मदमस्त
अन मंद श्वास हा जीवघेणा
माझाच घडला गुन्हा सखे ग
डोळेच वळती पुन्हा पुन्हा!
नागिनीसम कटी सळ्सळे
काहूर मनात काहूर दाटे,
अलगद ऊचलून मिठीत घ्यावे
असेच मजला मनात वाटॆ!
माझी राणी, माझी गजगामिनी
तुझ्या अशा या रंगकळा,
तुच सांग ग सांग पुन्हा
कसा तुला मी लाऊ लळा!
रघू व्यवहारे.
दि. २२ जुलै २०११
औरंगाबाद.
कसा तुला मी लाऊ लळा,
कमनीय तुझा हा रेशीमबांधा
-हदयात माझ्या ऊठती कळा!
भुरभूरणा-या तुझ्या बटांची
गर्दी झाली भालावरती,
रसरशीत हे ऒठ तुझे
अन ईवलिशी हनुवटी!
ऊभार तुझे हे मदमस्त
अन मंद श्वास हा जीवघेणा
माझाच घडला गुन्हा सखे ग
डोळेच वळती पुन्हा पुन्हा!
नागिनीसम कटी सळ्सळे
काहूर मनात काहूर दाटे,
अलगद ऊचलून मिठीत घ्यावे
असेच मजला मनात वाटॆ!
माझी राणी, माझी गजगामिनी
तुझ्या अशा या रंगकळा,
तुच सांग ग सांग पुन्हा
कसा तुला मी लाऊ लळा!
रघू व्यवहारे.
दि. २२ जुलै २०११
औरंगाबाद.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा