२० जून, २०१८

मी बेभान माझा गगनाss त पतंग ग


आकाशी रंग
बाई आकाशी रंग ग 
भलताच दंग
बाई भलताच दंग ग 
माळावर उभा
कसं तापलंय अंग ग 
मी बेभान माझा
गगनाss त पतंग ग 
दूर आकाशात
गोत घेतोय पतंग ग 
मी बेभान माझा
गगनाss त पतंग ग 

लपेटतोय चक्री
असा धागा हा संथ ग 
अन डोळे नभाकड
गिरक्या घेतोय पतंग ग 

मी बेभान माझा
गगनाss त पतंग ग 

दूर तुझ्या गच्चीवर
उभी तू निवांत ग
मंद झुळूक वा-याची
नसानसांत सुगंध ग

 आकाशी रंग
बाई आकाशी रंग ग 
मी बेभान माझा
गगनाss त पतंग ग 
lyrics
रघुनाथदादा पाटील



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

for more details : visit facebook page